नेल्सन मंडेला मराठी माहिती | Nelson Mandela Information in Marathi | Nelson Mandela Biography in Marathi | Nelson Mandela wikipedia in marahi
नेल्सन मंडेला मराठी माहिती | Nelson Mandela Information in Marathi
या जगामध्ये असा देखील एक मोठा काळ होता, जिथे सर्व सुख-सुविधा माणसाचा रंग बघून दिल्या जायच्या. होय अगदी बस च्या सीटवर बसण्यापासून ते पिण्याचे पाणी इथपर्यंत. पण असं नेहमी म्हटलं जातं की वाईटावर नेहमी सत्याचाच विजय होतो आणि असचं इथे सुद्धा घडलं अशा या घाणेरड्या आणि अमानवीय व्यवस्थेला उखडून फेकण्याचा ज्यांनी विक्रम केला, एक अशी व्यवस्था जिथे फक्त आणि फक्त भेदभावचं होता. उभं आयुष्य दुसऱ्यासाठी खर्ची घातलं, दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याची तब्बल सत्तावीस वर्ष ज्याने जेलमध्ये घालवली. असे थोर क्रांतिकारक, जागतिक समाजसुधारक " नेल्सन मंडेला " यांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
नेल्सन मंडेला यांचा जन्म आणि बालपण
18 जुलै 1918 साली मवेझो, दक्षिण आफ्रिका येथे नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला. राजघराण्याचा वारसा असलेले नेल्सन मंडेला यांचे वडील सुद्धा गावाचे प्रमुख होते. पण त्याच वेळी एका भ्रष्टाचाराच्या घटने मुळे त्यांना त्या गावातून बेदखल करण्यात आले. पुढे ते दक्षिण आफ्रिकेच्या कुनू या गावी स्थित झाले. तिथे नेल्सन घरातील गायी, म्हशी चरायला घेऊन जात असत. त्यांचे लहानपणीचे नाव " रोहीलाला " होते ज्याचा अर्थ होतो मस्तीखोर, " नेल्सन " हे नाव त्यांना त्यांच्या शिक्षकाने दिले होते. नेल्सन लहानपणापासूनच अत्यंत मस्तीखोर त्याचबरोबर दयाळू सुद्धा होते.
वय वर्षे 12 असतानाच त्यांचे वडील ' गॅडला हेनरी ' यांचे lungs disease मुळे निधन झाले. पुढे त्यांचा सांभाळ जोगीनताबा यांनी केला, ते सुद्धा एका गावाचे प्रमुख होते आणि त्यांना प्रमुख बनवण्यासाठी नेल्सन यांच्या वडिलांचा खूप मोठा वाटा होता. त्यावेळी आफ्रिकेवर ब्रिटिशांची सत्ता होती. स्थानिक नेत्यांच्या भाषणामुळे नेल्सन यांना कळून चुकले होते, की आपण मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलो आहोत. पुढील माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी क्लार्क बरी या इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला.
साऊथ अफ्रिकेमध्ये त्यावेळेस 75 ते 80 टक्के लोक हे मूळ निवासी कृष्णवर्णीय (काळ्या रंगाचे ) होते तरीसुद्धा फक्त 20 टक्के असलेले ब्रिटिश सरकार त्यांच्यावर अतोनात अत्याचार करत होते त्यांना साध्या मतदानाचा देखील अधिकार नव्हता. या सर्व गोष्टी हळूहळू नेल्सन मंडेला यांना समजायला लागल्या होत्या. 1937 साली पुढील शिक्षणासाठी त्यांनी Healdtown या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. इथे ते तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत अधिकार आणि हक्कांबाबत जागृत करू लागले, त्यांनी भरपूर भाषणे द्यायला सुरुवात केली, भारताचे महात्मा गांधी त्यांचे आदर्श आहेत असं ते नेहमी म्हणायचे. पण इथे आता इंग्रजांना यांच्यामुळे अडचण निर्माण होऊ लागली. त्यांनी ब्रिटिश सरकारविरोधात अशी काही भाषणे दिली ज्यामुळे त्यांना कॉलेजमधून इंग्रजांनी बेदखल केले ज्यामुळे त्यांचे शिक्षण देखील अर्धवट राहिले.
अधिक वाचा : महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती | Mahatma Gandhi information in marathi
नेल्सन मंडेला यांचा संघर्ष आणि लढा
Youth league बनवून त्यांनी अनेक गोष्टींना वाचा फोडली, 1944 साली त्यांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार करण्यासाठी लोकांना सांगितले. याच वेळी ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेस चे अध्यक्ष वॉल्टर सीसुलु यांच्या संपर्क मध्ये आले आणि त्यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले. त्याचबरोबर त्यांनी एवलीन मेस या महिलेशी विवाह केला. कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकारच नसल्यामुळे, ब्रिटीशांचेच सरकार बहुमताने निवडून येत असत.
याचदरम्यान ब्रिटिश सरकारने असे अनेक कायदे लागू केले ज्यामध्ये अगदीच हीन दर्जाची वागणूक मूळ निवासी लोकांना मिळायला लागली. नेल्सन मंडेला हे हळू हळू कम्युनिस्ट होऊ लागले होते, ब्रिटिशांसोबत चांगले वागून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे नेल्सन यांना आता कळून चुकले होते. त्यामुळे ब्रिटिशांवर छिपे हल्ले, gorrila warfare त्यांनी चालू केले. पुन्हा एकदा ब्रिटिश सरकार सत्तेमध्ये आले आणि 1950 मध्ये त्यांनी सप्रेशन ॲक्ट लागू केला ज्यानुसार जेवढेपण कम्युनिस्ट लोकं आहेत, पक्ष आहेत यांच्यावर बंदी घालण्यात आली, यामध्येच नेल्सन मंडेला, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस इत्यादींवर बंदी घालण्यात आली. जे कोणी कम्युनिस्ट लोकं आहेत त्यांना शोधून, पकडून जेल मध्ये डांबन्यात आले. 1956 साली अशाच प्रकारे नेल्सन यांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर हिंसा घडवून आणल्याचा व देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. 1-2 नाही तर तब्बल 6 वर्षे हा खटला चालू राहिला आणि सरतेशेवटी पुरव्यांअभावी त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. यादरम्यान त्यांना अनेक वेळा जेल मध्ये सुद्धा जावे लागले. नेल्सन यांना लोकं आता स्वतःचा लीडर मानू लागले होते. भरपूर शिक्षित असल्यामुळे पोलीससुद्धा त्यांना अटक करताना आता विचार करायचे, नेल्सन यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर होते.
आणि याच दरम्यान ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीला म्हणजेच " विनी " यांना सुद्धा भेटले. ते विनी यांच्या विचारांनी प्रभावीत झाले आणि त्यांच्याशी विवाह देखील केला. दिवसेंदिवस नेल्सन जनमाणसात लोकप्रिय होऊ लागले होते आणि हीच गोष्ट ब्रिटिश सरकारच्या लक्षात आली आणि भविष्यातील भलामोठा धोका टाळण्यासाठी इंग्रजांनी नेल्सन यांना अटक करण्याचे ठरवले. 12 जून 1964 साली नेल्सन यांना हिंसा, देशद्रोह, सरकार विरुद्ध लोकांना भडकवणे या गोष्टीसाठी अटक करण्यात आली. सगळ्यात पहिल्यांदा यांना फाशी ची शिक्षा सुनावण्यात आली पण जनतेचा आक्रोश बघून त्यानंतर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षा भोगण्यासाठी त्यांना चारही बाजूनी समुद्राने वेढलेल्या एका टापूवर बंदिस्त करण्यात आले. ह्या टापुचे नाव " रोबेन आयलंड " असे होते. हा टापू अगदीच अंदमान-निकोबार बेटावरील सेल्युलर जेल प्रमाणे होता जिथे भारतातील क्रांतिकारींना ठेवण्यात येत असे. केवळ 7 बाय 8 च्या एका खूपच बारीक खोली मध्ये त्यांना ठेवण्यात आले.
अधिक वाचा : विनायक दामोदर सावरकर यांची माहिती | Savarkar | Veer Savarkar information in Marathi
इथे त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले, इथे ठेवलेल्या कैदिंना मारहाण करण्यात येत असे, अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असे. भरपूर अस्वछता व पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे त्यांना इथेच T. B. हा गंभीर रोग झाला. या सगळ्यावरही नेल्सन यांनी हार न मानता, खचून न जाता वेळोवेळी आवाज उठवला. पुढे त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले, म्हणजे एक अशी खोली जिथे प्रचंड भयान शांतता असायची, कोणीही आजूबाजूला फिरकत देखील नसे, फक्त आपल्या खोलीच्या एका बारीक खिडकीतून सूर्यप्रकाश येत असे. या वेळी त्यांना एक एक मिनिट सुद्धा हा एका वर्षासारखा वाटत होता असं नेल्सन आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात.
इंग्रजांना ही कीड कायमची नष्ट करायची होती आणि यामुळेच इंग्रजांनी अथक प्रयत्न देखील केले. त्यातीलच एक म्हणजे, एके दिवशी एका रात्री एक माणूस नेल्सन यांच्या खोलीजवळ आला व म्हणाला मी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचा माणूस आहे व तुम्हाला इथून सोडवण्यासाठी आलो आहे, तुम्ही माझ्यासोबत चला आपण इथून पळून जाऊ. पण नेल्सन यांना कळून चुकले की हा नक्कीच ब्रिटीशांचा डाव असणार, जसे नेल्सन आणि त्याचा सहकारी पळण्यासाठी बाहेर पडतील तेव्हा नेल्सन यांना गोळ्या मारून ठार करण्याचा प्लॅन नेल्सन मंडेला यांच्या लक्षात आला होता म्हणूनच त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला.
याच दरम्यान त्यांच्या आईचे तसेच त्यांना सर्वात जवळचा असलेला त्यांचा मोठा मुलगा थेंबी यांचे निधन झाले. जेव्हा थेंबी यांच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळेस त्यांनी अभिमानाने त्यांच्या वडिलांचा म्हणजेच नेल्सन मंडेला यांचा काळा कोट परिधान केला होता. या दोन गोष्टींमुळे नेल्सन मंडेला अगदीच मनातून खचून गेले. त्यांना वर्षातून फक्त एकदाच ते सुद्धा फक्त 30 मिनिटे घरच्यांना भेटता येत असे. येथील बरीच वर्ष त्यांनी भविष्यातील प्लँनिंग, सरकारचा निषेध आणि काळजाला पिळवटून टाकणारे दुःख या मध्ये व्यतीत केली.
1-2 नाही तर तब्बल 18 वर्षानंतर त्यांचे रोबेन आयलंड वरून स्थलांतर करण्यात आले, तिथून त्यांना पोल्स मोअर प्रिजन या ठिकाणी ठेवण्यात आले. या दरम्यान ब्रिटिश सरकारवर लोकांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत होता, त्याचबरोबर नेल्सन यांना सोडण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत होती. त्यावेळेसचे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान P. W. Botha यांनी नेल्सन मंडेला यांच्यासोबत बऱ्याच वेळा तह करण्याचा निर्णय देखील घेतला, यापुढे सरकारच्या विरोधात जायचे नाही व कुठलेही निषेध, आंदोलने करायची नाही या अटींवर नेल्सन यांना सोडण्यात देखील आले असते पण नेल्सन यांना पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं आणि म्हणूनच त्यांनी तहासाठी पूर्णपणे नकार दिला.
जवळपास अजून 10 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर, P. W. Botha यांचे निधन झाले. आणि त्यांनतर आफ्रिकेचे नवीन पंतप्रधान फ्रेड्रिक विल्यम् दि क्लर्क यांनी नेल्सन मंडेला यांचे विचार जुळवून घेतले आणि अखेर 11 फेब्रुवारी 1990 साली तब्बल 27 वर्षांची शिक्षा भोगलेल्या नेल्सन मंडेला यांची त्यांनी सुटका केली. त्याचबरोबर त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षावर असलेला बंद देखील उठवला. आफ्रिकेतील लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. जेलमधून बाहेर येताच आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाचे प्रमुख नेल्सन मंडेला यांना करण्यात आले.
अखेर 10 मे 1994 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले ( काळे ) अश्वेत पंतप्रधान बनले. पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी अनेक कायदे लागू केले, शेकडो वर्षे ज्यांना वर्णभेद, रंगभेद यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागत होते, त्या गोष्टी त्यांनी संपुष्टात आणल्या. जून 1999 पर्यंत ते दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान होते त्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. दक्षिण आफ्रिकेत १९९४ पर्यंत मतदानाचा अधिकार फक्त श्वेत वर्णीयांनाच होता.
Nelson Mandela awards नेल्सन मंडेला पुरस्कार
1993 साली त्यांनी केलेल्या महान, परोपकारी कार्याबद्दल त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा " नोबेल प्राइज " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
5 डिसेंबर 2013 साली वयाच्या 95 व्या वर्षी या महान माणसाने हे जग कायमचे सोडले. त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना तब्बल 260 मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान " भारत रत्न " या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले. नेल्सन मंडेला भारत रत्न
मी कोणी देवदूत नव्हतो, एक सामान्य व्यक्ती होतो पण असामान्य परिस्थितीमुळे नेता झालो.
-- नेल्सन मंडेला
तर " नेल्सन मंडेला मराठी माहिती | Nelson Mandela Information in Marathi | Nelson Mandela Biography in Marathi " यांची Biography In Marathi तुम्हाला कशी वाटली हे नक्की comments मार्फत कळवा. धन्यवाद !!