नमस्कार मित्रांनो !! महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती | Mahatma Gandhi information in marathi
जर तुम्ही एका डोळ्याच्या बदल्यात, समोरच्याचा एक डोळा फोडलात, तर अशाने संपूर्ण जग आंधळं होईल..!!
- महात्मा गांधी.
मित्रांनो आज आपण ज्या स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत आहोत, तो देश तब्बल दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीच्या बेड्यात अडकला होता, आणि ह्याच जुलमी बेड्या तोडण्यासाठी कित्येक महान क्रांतिवीरांनी आपला जन्म यासाठी खर्ची घातला, आणि त्यातीलच एक महत्वाचं नाव म्हणजे राष्ट्रपिता “ महात्मा गांधी " . महात्मा गांधी हे नाव माहिती नसलेला व्यक्ती निदान संपूर्ण भारतामध्ये तरी शोधून सापडणार नाही.
महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh in marathi | about mahatma gandhi | Mahatma Gandhi Essay | महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य मराठी
आजच्या या लेखामध्ये आपण महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
महात्मा गांधींचा जन्म | Mahatma Gandhi birth
मोहनदास करमचंद गांधी ( mohandas karamchand gandhi) यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातच्या “ पोरबंदर " शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी वर आईचे नाव पुतलीबाई होतं. महात्मा गांधी यांचा जन्म जरी पोरबंदर शहरात झाला असला तरी काही वर्षातच ते राजकोट ला स्थलांतरित झाले. आणि त्यांचे सुरुवातीचे शिक्षणसुद्धा राजकोटलाच झाले. त्यांना सुरुवातीपासूनच वाचनाची भयंकर आवड होती, वयाच्या 9 व्या वर्षी ते प्रथम शाळेत गेले.
महात्मा गांधी कुटुंब आणि शिक्षण | Mahatma Gandhi family and education
यानंतर काहीच वर्षानंतर म्हणजे जेव्हा गांधीजींचे वय फक्त 13 वर्ष होतं त्यावेळेस त्यांचं लग्न कस्तुरबा यांच्यासोबत लावण्यात आलं, गमतीची गोष्ट म्हणजे कस्तुरबा या एक वर्षांनी महात्मा गांधीजीं पेक्षा मोठ्या होत्या. महात्मा गांधी यांचं वय 15 वर्ष असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच करमचंद यांचे निधन झालं, आणि घरची सर्व जबाबदारी गांधीजींवर येऊन पडली. अशातच त्यांचं जन्माला आलेलं पहिलं मुलसुद्धा काही कारणास्तव दगावलं, पण तरीही ते डगमगले नाहीत व स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले. 1887 साली त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद मधून हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी गुजरातमध्येच महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण केलं.
त्यानंतर एका गृहस्थाच्या सांगण्यावरून ते law चे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. 4 सप्टेंबर 1888 साली ते लंडनला रवाना झाले. 1891 साली ते आपलं शिक्षण पूर्ण करून मायदेशी भारतात परत आले.
विदेशात शिक्षण घेऊन परतले असताना देखील, भारतामध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली. पण अखेर 1893 साली त्यांना दादा अब्दुल्ला and कंपनी या एका भारतीय कंपनी मध्ये नोकरी मिळाली. पण ही नोकरी करण्यासाठी त्यांना 1 वर्षाच्या Agreement वर साऊथ आफ्रिकेला जावे लागले.
अधिक वाचा : भगत सिंग माहिती मराठी | Bhagat Singh Information in Marathi
महात्मा गांधी जयंती 2023
महात्मा गांधी यांचे कार्य | Mahatma Gandhi's work | महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य मराठी
साऊथ आफ्रिकेमध्ये ते राहिले असताना त्यांना बऱ्याच वेळा भेदभावाचा सामना करावा लागला, आणि ह्याच गोष्टी सहन करून ते अधिक मजबूत होत गेले. साऊथ आफ्रिकेमध्ये सुरुवातीला फक्त एका वर्षासाठी गेलेल्या गांधीजींना तिथल्या भारतीय लोकांनी विनवणी केली, वं गांधीजी देखील तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तब्बल पुढची वीस वर्ष राहिले. आणि याच दरम्यान त्यांनी Natal Indian Congress ची स्थापना केली.
साऊथ आफ्रिकेमध्ये सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे निडर, लीडर म्हणून गांधीजी लोकांच्या पसंतीस उतरू लागले होते, त्यांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली होती. आणि अशा रस्त्यांची सर्वात जास्त गरज आता भारताला आहे, हे भारतातील काही बड्या नेत्यांना समजलं, आणि त्याच वेळेस गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींना भारतात येऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी इथल्या लोकांना प्रेरित करण्याची विनंती केली.
अधिक वाचा : बिपिन चंद्र पाल : Bipin Chandra Pal Information in Marathi
आणि अखेर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विनंतीला मान देऊन महात्मा गांधीजी 1915 साली भारतामध्ये दाखल झाले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी लगेच इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला सामील होऊन आपले कार्य सुरू केले. विविध जाती व्यवस्था मध्ये विखुरलेल्या भारतातील लोकांना एकत्र करायला गांधीजींनी सुरुवात केली. पुढील काही वर्षातच मोहनदास गांधी हे नाव संपूर्ण भारतात वाऱ्यासारखं पसरलं.
1922 साली मोहनदास गांधी यांनी असहकार आंदोलन छेडलं. ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार करणे, उदाहरणार्थ ब्रिटिश कापड, शिक्षण, वस्तू, ई. या सगळ्यावर बहिष्कार करायला भारतीय जनतेने चालू केलं. आणि बघता बघता संपूर्ण भारतभर हे आंदोलन अगदी वणव्यासारखं पेटलं. आणि या असहकार आंदोलनाचा एकदम जबरदस्त प्रभाव ब्रिटिशांच्या सत्तेवर पडला. कुठेतरी हे थांबायला हवं म्हणून ब्रिटिशांनी 1922 साली महात्मा गांधीजींना 2 वर्षांसाठी तुरुंगात पाठवलं. पण यानंतर भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांविरुद्ध अधिकच रोष पसरला, वं संपूर्ण भारत आता एक होऊ लागला होता.
पुढे 1930 साली महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली, फक्त 60-70 जणांसोबत सुरू केलेल्या या यात्रेमध्ये तब्बल 60 हजार लोक एकत्र आले. यानंतर मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, अशा अनेक आंदोलनांचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलं, आणि ब्रिटिश राजवट उलथी करायला याचा थेट फायदा झाला.
महात्मा गांधीजींनी पेटवलेल्या चिंगारी चे रूपांतर आता आगीमध्ये झालेलं होतं, आणि महात्मा गांधीजीं सोबतच अनेक क्रांतिवीरांनी एकत्र येऊन आपलं सारं आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्ची घातलं, आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला.
अधिक वाचा : विनायक दामोदर सावरकर यांची माहिती | Savarkar | Veer Savarkar information in Marathi
महात्मा गांधी यांचा मृत्यू | mahatma gandhi death
संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा आनंद साजरा होतच होता, आणि अशातच नथुराम गोडसे त्याने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे संपूर्ण भारतामध्ये शोककळा पसरली, अखेर 15 नोव्हेंबर 1949 साली नथुराम गोडसे याला फासावर लटकवण्यात आलं.
आज आपण ज्या स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत आहोत, तो स्वतंत्र करण्यासाठी हजारो क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं, आणि या सर्वांमध्ये महात्मा गांधीजी यांचं नाव नेहमी अग्रस्थानी घेतलं जाईल. महात्मा गांधीजी आयुष्यभर अहिंसेच्या मार्गांवर चालत राहिले. तर मित्रांनो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.
अधिक वाचा : नेल्सन मंडेला मराठी माहिती | Nelson Mandela Information in Marathi
' महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती | Mahatma Gandhi information in marathi ' वाचल्याबद्दल धन्यवाद !!