संत एकनाथ महाराजांची माहिती | Sant Eknath Information in Marathi
नमस्कार मित्रांनो,
आजच्या या लेखामध्ये आपण एका अशा महान संताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगत असलेल्या समाजामध्ये स्वाभिमानाची फुंकर घातली, देशाभिमान जागावला व आपल्या मधाळ वाणीने लोकांना आपलंस करून पुन्हा एकदा भक्तीमार्ग दाखवला. परकीय आक्रमणांच्या जवळपास दीडशे वर्षानंतर, संत ज्ञानेश्वर व संत नामदेवानंतर, समाजातील कचरा ज्यांनी साफ केला, धर्म, संस्कृती, वेद, इत्यादींची ज्यांनी समाजाला पुन्हा एकदा नव्याने ओळख करून दिली, तब्बल पाऊण लाख कवितांचा विक्रम असलेले, या महान राष्ट्राला तथा देशाला लाभलेले सुप्रसिद्ध संत, “ संत एकनाथ " sant eknath | eknath maharaj यांच्या बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
संत एकनाथांचा जन्म आणि बालपण | संत एकनाथांचा जन्म कोठे झाला ? :
इसवी सन 1533 साली, महाराष्ट्रातील पैठण येथे संत भानुदासांच्या वंशामध्ये संत एकनाथांचा जन्म झाला. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळात जन्माला आलेल्या संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी बाई असे होते. संत एकनाथ लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झालं, असं असलं तरी त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी व आजी सरस्वती यांनी केला.
वयाच्या सहाव्या वर्षी संत एकनाथांची मुंज झाली व यानंतर लगेचच त्यांच्या आजोबांच्या सांगण्यावरून अध्ययनाला सुरुवात झाली. अवघ्या पुढील सहा वर्षात संत एकनाथांनी अनेक वेदांचे अध्ययन केलं, अनेक विद्या आणि शास्त्रामध्ये ते विद्वान झाले.
अधिक वाचा : संत ज्ञानेश्वर यांची माहिती | Sant Dnyaneshwar Information in Marathi
संत एकनाथांचे गुरु :
आजोबा चक्रपाणी यांच्या सांगण्यावरून संत एकनाथ, पुढील अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी, चाळीसगावचे रहिवाशी असणाऱ्या व देवगिरीचे किल्लेदार असणाऱ्या, जनार्दन स्वामी यांच्याकडे गेले. जनार्दन स्वामी हे सुलभंजन पर्वतावर अनुष्ठान करीत असत. पुढे याच सुलभंजन पर्वतावर जनार्दन स्वामींनी मलंग वेशामध्ये संत एकनाथांना दत्ताचं दर्शन घडवलं, अशी कथा प्रसिद्ध आहे. sant eknath
जनार्दन स्वामींचे तीन शिष्य इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे एक अर्थात एकनाथ महाराज, रामा जनार्दन व जनी जनार्दन.
अध्यात्मिक शिक्षणाबरोबरच संत एकनाथ यांनी हिशोब ठेवणे, युद्धकला, संस्कृत भाषा, इत्यादी अनेक प्रकारचं ज्ञान आपले गुरु जनार्दन यांच्याकडून मिळवलं.
12 वर्ष हे ज्ञान मिळवल्यानंतर, गुरु व शिष्य यांनी मिळून एक तीर्थ यात्रा केली. आणि या यात्रेदरम्यान आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून संत एकनाथांनी पहिल्यांदा कविता लिहिली. हा कवितेचा ग्रंथ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूर्ण झाला. "चतुश्लोकी भागवत" असे या ग्रंथाचे नाव होय.
आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार संत एकनाथांनी भारतातील उर्वरित तीर्थस्थळे केली आणि पैठणला परतले.
संत एकनाथांचे वैवाहिक जीवन :
वयाच्या 24 व्या वर्षी पैठणच्या गिरीजाबाई यांच्याशी संत एकनाथांचा विवाह झाला. पुढे वयाची 40 वर्ष त्यांनी पैठणमध्येच घालवली. संत एकनाथांना दोन मुली व एक मुलगा होता. गोदावरी, लीला आणि हरी अशी या मुलांची नावे होय. हरी हा पुढे संस्कृतचा विद्वान पंडित झाला.
संत एकनाथांच्या पत्नी गिरीजाबाई यांनी त्यांना नेहमीच साथ दिली. संत एकनाथ हे ब्राह्मण असून त्यांनी सदैव बहुजनांची साथ दिली, त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आवाज उठवला. पशु, प्राणी व इतर सजीव हे सर्व ईश्वराची लेकरे आहेत असं ते समजायचे.
अधिक वाचा : संत तुकाराम माहिती मराठी - Sant Tukaram Information in Marathi
संत एकनाथ यांचे कार्य :
संत एकनाथांनी त्यांच्या 64 वर्षांच्या काळामध्ये हजारो ओव्या, कविता, भारुड लिहून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. याचबरोबर संत ज्ञानेश्वरांची विस्मरणात गेलेली समाधी त्यांनी आळंदी येथे 1583 साली शोधून काढली. समाधीवर पूजा-अर्चा करण्याचं कामं त्यांनी सुरु केलं.
संत ज्ञानेश्वर यांच्या निधनानंतर पुढील अडीचशे तीनशे वर्षांमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये लोकांनी हवे नको ते बदल करून, बऱ्याच ठिकाणी चुकीची माहिती पसरवली होती. अनेक पोत्यात जमा करून संत एकनाथांनी नेमकी ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेली ओवी कोणती असेल, याचा अभ्यास करून पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीची एक अधिकृत अशी शुद्ध प्रत प्रसिद्ध केली. ज्ञानेश्वरी चे शुद्धीकरण करून त्यांनी समस्त समाजाला एक अमूल्य भेट दिली.
संत एकनाथांच्या आयुष्यातील काही घटना :
संत एकनाथ काशीवरून रामेश्वरमला परतत असताना, त्यांनी त्यांच्यासोबत आणलेलं गंगाजल एका गर्मीने व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजलं, तडफडणाऱ्या मुक्या जनावराला पाणी पाजून आपली ही यात्रा सुफळ संपूर्ण झाली असे उद्गार त्यांनी काढले. ही कथा सर्वत्र प्रसिद्ध आहे.
असंही म्हटलं जातं की एका मुसलमान माणसाने त्यांच्या अंगावर 100 वेळा थुकलं होतं, पण त्याला एक शब्दही न उच्चारता 100 वेळा संत एकनाथांनी गंगेमध्ये स्नान केलं व पुन्हा येऊन समोर उभे राहिले. आणि यामुळेच जनमानसात त्यांना “ शांतीब्रह्म " म्हणून ओळखले जाऊ लागले.
संत एकनाथांचे ग्रंथ साहित्य | sant eknath granth :
अनुभवानंद, आनंदलहरी, एकनाथी अभंग गाथा, चिरंजीवी पद, एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, मुद्रा विलास भावार्थ रामायण (एकूण 40,000 ओव्या ), स्वात्म बोध, हस्तमालक टीका अशा अनेक ओव्या वं ग्रंथ संत एकनाथांनी लिहिले.
संत ज्ञानेश्वरांनी जरी भारुडाची प्रथम निर्मिती केली असली तरी सुद्धा संत एकनाथांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भारुड हा प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्यांनी काही प्रकारची भारुड लिहिली, जसे की वासुदेव, भराडी, भुत्या, पोतराज, जोशी, गोंधळी, शकुनी, कोल्हाटी, माळी, मांड, जोगी, ई. विविध छंद वापरून संत एकनाथांनी जवळपास साडेतीनशे भारुडं लिहिली.
संत एकनाथ महाराजांची समाधी :
मानवतेचे उच्च प्रतीक असणारे, आपल्या लेखणीतून समस्त समाजाला मंत्रमुग्ध करणाऱ्या संत एकनाथांनी कृतार्थ जीवन जगून फाल्गुन वैद्य षष्ठी, इसवी सन 1599 मध्ये जलसमाधी घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की याच तिथीला त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा, जन्म, समाधी, याच तिथीला जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना दत्ताचं दर्शन घडवलं होतं.
संत एकनाथांनी त्यांच्या शेवटच्या कीर्तनामध्ये स्वतःच्या निरूपणाचा एक अभंग घेतला तो असा की..
“ धर्माची वात मोडे, अधर्माची शीघ चढे, तय आम्हा येणे घडे, संसार स्थिती || १ || "
या अभंगांमध्ये आपले अवतार कार्य सांगून अखेर त्यांनी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली.
धन्यवाद " संत एकनाथ महाराजांची माहिती | Sant Eknath Information in Marathi " वाचल्याबद्दल !!