sant tukaram |
नमस्कार मित्रांनो,
संत तुकाराम माहिती मराठी - Sant Tukaram Information in Marathi या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक संत-महात्मे होऊन गेले. ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या अभंगामधून आजही मनुष्यप्राणी स्वतःच्या जीवनामधील दुःख, दारिद्र्य, इ घालवण्याचा यशस्वी प्रयत्न करतो आहे. सुख, शांती, समाधान, हे काय आहे हे त्यांच्या श्लोकांचा गर्भितार्थातून आपल्याला समजतं. आज आपण एका अशा संताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची वाणी म्हणजे देववाणी. त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द, हा जसा काही देवच बोलत आहे असा आभास व्हायचा. ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शेकडो अभंग रचून, समाजाला भक्तिमार्गावर चालण्याचा संदेश दिला. संत संप्रदायातील एक महान संत “संत तुकाराम" यांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
जे का रंजले गांजले,
त्यांसी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा ||
- संत तुकाराम (Sant Tukaram).
information about sant tukaram in marathi
संत तुकाराम महाराजांचा ( sant tukaram maharaj) जन्म
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू या गावी, माघ शुद्ध पंचमी म्हणजेच 22 जानेवारी 1608 रोजी झाला होता. त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असं होतं (sant tukaram full name in marathi). त्यांच्या वडिलांकडे परंपरागत चालत आलेला सावकारीचा व्यवसाय होता. तुकारामांचे वय अवघे सतरा-अठरा असताना त्यांचे आई-वडील मरण पावले. तुकाराम यांना दोन भाऊ देखील होते, मोठा भाऊ सावजी तर लहान भाऊ कान्होबा. मोठा भाऊ सावजी यांची वृत्ती बरोबर नव्हती त्यामुळे तो लहानपणीच तीर्थाटनाला गेला व घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबा यांच्यावर आली होती.
संत तुकाराम यांचे एक वाण्याचे दुकान देखील होते, काही वर्षांनंतर महाराष्ट्र मध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आणि त्यावेळेस मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण रसातळाला गेली, गुरेढोरे देखील दुष्काळामुळे मरण पावली. अशा वेळेस काय करावं हे त्यांनाही सुचत नव्हतं. एक वेळ अशी आली होती की त्यांना आयुष्याचा कंटाळा आला होता. पण अशातचं त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य त्यांना भेटले वं त्यांनी देवाची भक्ती करण्याचा सल्ला दिला.
अधिक वाचा : संत ज्ञानेश्वर यांची माहिती | Sant Dnyaneshwar Information in Marathi
विठ्ठलाचे नामस्मरण
यानंतर तुकारामांनी सतत विठ्ठलाचे नामस्मरण चालू केले. नंतर नंतर ते विठ्ठल नामामध्ये एवढे गुंतून जायचे की त्यांची तहान भूक हरपून जायची. हळूहळू त्यांनी त्यांचा ओढा कीर्तनाकडे वळवला. ते त्यांच्या कीर्तनातून अनेक अभंग रचायला लागले. काहीच वर्षांनी त्यांनी स्वतः भौतिक सुखांचा त्याग केला व लोकांना त्यांच्या संसारामध्ये सुखी कसे राहता येईल याचा मूलमंत्र दिला. जेव्हा महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता त्यावेळेस लोकांची झालेली गळचेपी त्यांना दिसली आणि म्हणूनच त्यांनी सावकारीच्या जाचातून लोकांना मुक्त करण्यासाठी, त्यांनी गहाणवाटीची सर्व कागदपत्रे इंद्रायणी नदी मध्ये बुडवली.
त्यांच्या कीर्तन प्रवचनांमधून ते लोकप्रिय होऊ लागले. लोकं त्यांची किर्तनं ऐकायला गर्दी करू लागले. संताजी जगनाडे या त्यांच्या बालपणीच्या मित्राने तुकारामांचे अभंग कागदावर उतरवण्याचे काम केले. संत तुकाराम यांची वाढती लोकप्रियता बघून अनेक लोकांनी, बुवांनी,त्यांच्या विरोधात अनेक कटकारस्थाने रचली पण या सर्वातून तुकाराम महाराज हे अगदी सहीसलामत सुटले. त्यांची बायको “ आवली " ही पुण्यातल्या आप्पाजी गुळवे यांची लेक होती. तीचा संत तुकारामांवर फार जीव होता, ती अगदी सावित्री प्रमाणे पतिव्रता होती पण तुकारामांच्या सततच्या, हरी नामामध्ये गुंतून जाण्याच्या सवयीमुळे, कीर्तने, भजने, यामुळे फार कंटाळली होती.
अधिक वाचा : राजमाता जिजाऊ जयंती विशेष | Rajmata Jijau Jayanti - 12 January 2022
संत तुकाराम संसारी होते त्यांना चार मुले होती. मुलींची नावे भागीरथी व काशी तर मुलांची नावे नारायण आणि महादेव अशी होती. जेव्हा महाराष्ट्रामध्ये जबर दुष्काळ पडला होता त्या वेळेस त्यांची दोन मुले मरण पावली. information about sant tukaram Sant tukaram information in marathi
कीर्तनातून, अभंगांमधून समाज प्रबोधन
संत तुकारामांनी त्यांच्या अनेक गवळणी मधून,कीर्तनातून, अभंगांमधून समाज प्रबोधनाचे देखील कार्य केलं. समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी प्रथा, अंधश्रद्धा इत्यादींवर त्यांनी त्यांच्या अभंगांमधून घाला घातला. श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी हा मूलमंत्र त्यांनी जनतेला दिला. दिवसभर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे संत तुकाराम यांचे कीर्तन ऐकायला सारा गाव गोळा व्हायचा. शिवअवतारी शिवपुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील संत तुकारामांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती.
संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली वारकरी संप्रदायेचि प्रथा तुकारामांनी कळसावर नेऊन ठेवली. जातीप्रथा, धर्म भेदभाव, यामध्ये जखडलेल्या समाजाला त्यांनी नवी दिशा दिली. स्वतःचा संसार सोडून जगाचा संसार नीट चालावा म्हणून समाज प्रबोधन करणारे तुकाराम हे “ जगद्गुरु " झाले.
अधिक वाचा : गुरुपौर्णिमा | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | guru purnima in marathi
जेव्हा संत तुकारामांच्या आयुष्यात फार कठीण प्रसंग ओढवला होता, जेव्हा त्यांना काहीही सुचत नव्हतं अशा वेळेस त्यांनी विठ्ठलाची भक्ती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी देहू गावातील जवळच्याच एका डोंगरावर विठ्ठलाचे नामस्मरण करण्याचा निर्धार केला. या भंडारा डोंगरावर संत तुकारामांनी तब्बल तेरा दिवस सलग विठ्ठलाची आराधना केली, यानंतर साक्षात परब्रह्म विठ्ठलाने तुकारामांना प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला होता असं मानलं जातं.
अधिक वाचा : संत एकनाथ महाराजांची माहिती | Sant Eknath Information in Marathi
तुकारामांकडे जे जे काही होतं ते सर्व त्यांनी दान केलं. महासागराएवढे भरलेले अंतकरण आणि गरिबांचा कळवळा असलेले संत तुकाराम हे फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठास गेले असं मानलं जातं. हा दिवस आजही “ तुकाराम बीज " म्हणून ओळखला जातो. देहू या गावी एक नांदुरकी चे झाड आहे, येथून दुपारी 12 वाजता संत तुकाराम वैकुंठाला गेले असं सांगितलं जातं, वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीविष्णूचे धाम!!
sant tukaram gatha |
संत तुकारामांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग एवढे अर्थ सांगून जातात की प्रत्येक अभंगांच्या अर्थावर पुस्तकं लिहिता येईल. महाराष्ट्राच्या मना मनामध्ये आपल्या ओवीतून, अभंगातून जिवंत असणारे संत तुकाराम हे नक्कीच मनुष्यरुपी देव अवतार होते यात दुमत नाही. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी, जनतेच्या कल्याणासाठी खर्ची घातले. संत ज्ञानेश्वर संत एकनाथ व संत नामदेव आनंतर भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतामध्ये फडकवणारे संत तुकाराम हे नक्कीच महान आत्मा होते. अशा या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना आमचा प्रणाम!
धन्यवाद "संत तुकाराम माहिती मराठी - Sant Tukaram Information in Marathi" ही माहिती वाचल्याबद्दल!!