ऑक्टोबर हिटपासून काळजी कशी घ्याल! | October Heat in Marathi
ऑक्टोबर हिटपासून काळजी कशी घ्याल! | October Heat in Marathi परतीच्या पावसाला सुरुवात होताचं, अनेक विभागातून मान्सूनने निरोप घेतलाय. तसेच देशातील अनेक भागातून पावसाने काढता पाय घेतला आहे. तत्पूर्वी ऑक्टोबर हिटपासून सतर्कता बाळगावी यासाठी मुंबई हवामान विभागानं आधीचं इशारा दिला आहे. ऑक्टोबर हिट आजपासून म्हणजेच 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर हिट 10 ते 14 ऑक्टोबरपर्यंत जाणावणार आहे.
या ऑक्टोबर हिट दरम्यान तापमान हे मुंबई उपनगरांत 34 ते 35 डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. तसेच महाराष्ट्राच्या इतर विभाग जसे की नाशिक, नागपूर, पुणे, मराठवाडा ह्याठिकानी ही ऑक्टोबर हिट चा प्रभाव जाणवेल.
दमट वातावरणाला सुरुवात होता, श्वसनाच्या निगडित त्रास असणाऱ्यांनी ह्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार 12 ते 14 ऑक्टोबरमध्ये तापमान थेट 37 डिग्री सेल्सिअस किंबहूना त्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे.
यंदा ऑक्टोबर दरवर्षी पेक्षा अधिक जाणवेल, किंवा अधिक तीव्र असेल ह्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीचं हेरला होता. पावसाचे उशीराचे आगमन, एकदाचं अतोनात बरसने, लवकरचं निरोप घेणे, ह्या गोष्टी जरा आश्चर्यकारकचं होत्या. महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाची ओढ अतीव लागली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला.
त्यानंतर या महिन्याच्या तीन तारखेपासून पावसाचा जोर कमी झाला. त्याच दिवसापासून ऑक्टोबर हिटची सुरुवात झाली होती, आणि हवामान विभागाच्या माहितीनुसार आज ११ ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर हिचं हिट अतिप्रमाणात प्रभावशाली असेल.
ऑक्टोबर हिटपासून काळजी कशी घ्याल!
१. दमट, उष्म वातावरणाचा त्रास होत असेल, तर गरम पदार्थांचा आहार टाळावा.
२. पाणी सोबत असू द्यावे. शरीरात पाण्याची कमी भासू देऊ नये.
३. आहारात शीत पदार्थ जसे की फळे, दूध-दही यांचा वापर वाढवावा.
४. मसाला, तेलकट इ. पदार्थ टाळावे.
५. इन्फेक्शन वगैरे असेल तर स्वच्छता राखावी.
६. संसर्ग/ व्हायरल असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करावी.
७. नियमित वेळेहून अधिक घाम जर भासत असेल तर योग्य ते उपचार घ्यावे.
८. शरीराला शांत, शीत ठेवण्याचा प्रयत्न करा.
९. हिटपासून वाचण्यासाठी डोक्यावर टोपी, अथवा रुमाल इत्यादी वापर करू शकता.
हे ही वाचा : October Heat : 'ऑक्टोबर हिट' काय आहे? काय काळजी घ्याल - Agrowon .
ऑक्टोबर हिटमुळे कुठले आजार संभावू शकता?
ऑक्टोबर हिट म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मधील सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांना आमंत्रण!
वरील कुठलाही त्रास जाणवल्यास तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार वेळेत घ्यावा.
धन्यवाद "ऑक्टोबर हिटपासून काळजी कशी घ्याल! | October Heat in Marathi" वाचल्याबद्दल !!